Maharashtra Assembly Winter Session : बीड जाळपोळ कटाचा मास्टरमाईंड शोधा, संदीप क्षीरसागरांच्या मागणीनंतर फडणवीस आणि जयंत पाटलांमध्ये खडाजंगी

Maharashtra Assembly Winter Session : राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरमध्ये सुरू आहे. अधिवेशनात आज बीड हिंसाचारावर चर्चा झाली. राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या प्रकरणी पोलीस प्रशासनाने हलगर्जीपणा केल्याचा गंभीर आरोप केला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सरकारची भूमिका स्पष्ट करताना सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

मास्टर माईंड शोधा.. संदीप क्षीरसागर

"बीड जाळपोळी प्रकरणारुन संदीप क्षीरसागर  यांनी सभागृहात आक्रमक भूमिका मांडली. लोकप्रतिनिधी म्हणून या प्रकरणाकडे बघताना या हिंसाचारात मराठा समाज किंवा इतर कोणत्याही समाजाचा हात नव्हता. हा एक सुनियोजित कट होता, असं मला वाटतं.." असे संदीप क्षीरसागर म्हणाले. तसेच या प्रकरणाचा मास्टरमाईंड शोधून काढा.. अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Shivsena MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेचा निर्णय नवीन वर्षातच! सुप्रीम कोर्टाकडून विधानसभाध्यक्षांना १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

"या हल्ल्यामध्ये असलेल्यांची कॉल रेकॉर्डिंग तपासावी. ते कोणाशी बोलले हे समजेल. या प्रकरणामुळेच राज्यात मराठा- ओबीसींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. याचा न्यायालयीन तपास करुन माहिती समोर यावी," अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली.

जयंत पाटील यांचे गंभीर आरोप...

या घटनेत पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. आत्तापर्यंत या प्रकरणी एसआयटीची स्थापना का केली गेली नाही? पालकमंत्र्यांच्या मागणीनंतर याची एसआयटी चौकशी का झाली नाही? असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला. तसेच या प्रकरणात सहभागी असलेला पप्पू शिंदे हा राजकीय पुढाऱ्याचा भाचा आहे, अनेकांचे राजकीय कनेक्शन समोर आले असल्याचेही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण..

"ही अतिशय गंभीर घटना आहे. जमावाकडून लोकप्रतिनीधींची घरे जाळण्यात आली. जवळपास सर्वच पक्षांच्या लोकांवर हल्ले करण्यात आले. भाजप अध्यक्षांचं ऑफिस जाळलं, दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेनेच्या गटावर हल्ला झाला. अशा प्रकरणांमध्ये राजकारण करणे योग्य नाही..." असे  देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दोन दिवसात SIT स्थापन करु...

तसेच "आत्तापर्यंत या प्रकरणात २७८ आरोपी अटक झाले आहेत. यामधील ३० ज सराईत गुन्हेगार आहेत. ध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यातील ६१ गुन्हेगार अजूनही सापडलेले नाहीत, त्यांचा देखील शोध सुरू आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच सभागृहाची इच्छा असेल तर दोन दिवसात या संदर्भात एसआयटी स्थापन करु.." असे आश्वासन दिले. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply