Maharashtra : निसर्गाचा अलौकिक आविष्कार, महाराष्ट्रातील असं गाव जेथे 1 तास उशीरा मावळतो सूर्य

 

Maharashtra : आपल्या महाराष्ट्राला निसर्गाच्या सौंदर्याच्या अप्रतिम छटांचं सौभाग्य प्राप्त झालंय. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात तुम्हाला निसर्गाचं वेगळंच सौंदर्य बघायला मिळेल. मात्र महराष्ट्राच्या एका कोपऱ्यात दडलेलं असं एक गाव आहे ज्याबाबत कदाचितच तुम्हाला माहिती असेल. येथून तुम्हाला निसर्गाचा नवा आविष्कारच बघायला मिळेल. यंदा महाराष्ट्रदिनी तुम्ही या ठिकाणाला आवर्जून भेट द्यायला हवी.

या गावाचं नाव 'फोफसंडी' असं आहे. अतिदुर्गम गाव असलेल्या फोफसंडीत निसर्गाचा अविष्कार पाहायला मिळातो. घाट रास्ता.. सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगर दऱ्यात लपलेले हे गाव... उंच डोंगरावरून फेसाळत येणारे विविध आकाराचे धबधबे.. तर भन्नाट वारा.. वाऱ्याच्या वेगाने हवेत उडणारे धबधब्यातील पाणी व मध्येच धुक्याच्या आगमनाने संपूर्ण परिसर आकाशमय... खोल दरीत असलेले ब्रिटिश अधिकारी फोफ साहेबांच्या नावाने परिचित असलेले हे फोफसंडी गाव! येथे सकाळी एक तास उशीरा सूर्य दिसतो. तर सायंकाळी एक तास लवकर डोंगराच्या आड तो लुप्त होतो.

१२०० लोकसंख्या, बारा वाड्या व बारा आडनावाचे लोक इथे राहतात. चार महिने पावसाळ्यात जे शेतीत उगवेल ते कमवून इतर आठ महिने रोजदारीसाठी पुणे व ठाणे जिल्ह्यात येथील नागरिक जातात. या गावी काही घरात गॅस आहे, तर बहुतांशी लोक चुलीवर स्वयंपाक करतात. 
गावात गिरण, जिल्हा परिषद शाळा, केंद्रीय आश्रमशाळा आहे. 

या गावाला फोफसंडी नाव का पडले?

७५ वर्षाचे भिवा पिलाजी वळे यांनी असे सांगितले की, फोफ नावाचा ब्रिटिश अधिकारी दर रविवारी गावात यायचा त्यामुळे गावाला फोफसंडी असे नाव पडले. 

हे गाव आपल्या महाराष्ट्रात असून यंदाच्या महाराष्ट्रदिनी तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊन निसर्गाचा हा अनोखा आविष्का एकदा स्वत:च्या डोळ्याने बघायलाच हवा. तसेच या ठिकाणी तुम्हाला गावराण जेवणाचा आनंदही घेता येईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply