Maharashtra : बॉडीगार्ड घेऊन सोन्या आणि छब्या बैलाची एन्ट्री; मालकासह बैलांनी फेडला देवाचा नवस

 

Maharashtra : मंत्री आणि आमदारांसोबत बॉडीगार्ड असणे हे सर्वसामान्य दृश्य आहे, पण बैलांसोबत बॉडीगार्ड पाहिले आहे का? सांगलीच्या एका शेतकऱ्याने आपल्या नवसपूर्तीसाठी हा अनोखा प्रकार घडवून आणला. आर्थिक यशासाठी नवस फेडण्याच्या उद्देशाने, सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील अंकुश खीलारी यांनी तब्बल १२५ किलोमीटरचा पायी प्रवास केला. आपल्या सोन्या आणि छब्या या बैलागाडीच्यासोबत बॉडीगार्ड घेऊन देवीचे नवस फेडले आहे.

देवीला नवस, आर्थिक उन्नती आणि 125 किमीचा पायी प्रवास

अंकुश खीलारी यांना आर्थिक यश मिळत नव्हते. त्यांनी कर्नाटकातील चिंचणी माय्याक्का देवीला नवस केला की, त्यांची परिस्थिती सुधारल्यास ते बैलगाडी घेऊन देवीच्या दर्शनाला येतील. नवस केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य येऊ लागले. आपल्या शब्दावर ठाम राहून त्यांनी बैलगाडी घेऊन चिंचणी माय्याक्का देवीच्या दर्शनासाठी प्रवास करण्याचा निर्णय घेतला.

Karnataka Bus Accident : बस- ट्रक्टरचा अपघात; नियंत्रण सुटून बस ३० फूट खड्ड्यात कोसळली, २० प्रवासी जखमी

लाखोंच्या गर्दीत 'बॉडीगार्ड'च्या सुरक्षिततेत बैलगाडी

१२५ किमीचा प्रवास पूर्ण करून सोन्या-छब्या बैलजोडीबरोबर माय्याक्का देवीच्या दर्शनासाठी पोहोचलेल्या अंकुश खीलारी यांचे आगमन विशेष आकर्षण ठरले. या लाखोंच्या गर्दीत सहा बॉडीगार्डने बैलांना वाट काढून देत देवीच्या प्रदर्शना घातल्या. बैलाचे बॉडीगार्ड पाहून लोक अचंबित होऊ लागले. लाखोंच्या भक्तांच्या गर्दीत बैलगाडी प्रविष्ट होताच प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. उपस्थित भाविकांनी सेल्फी आणि फोटो काढण्याचा सपाटा लावला.

बॉडीगार्डच्या संरक्षणात बैलांना देवीच्या प्रदक्षिणा घालण्यात आल्या आणि नवस फेडण्यात आला. हा अनोखा सोहळा पाहून भाविकांसाठी तो चर्चेचा विषय ठरला. या अनोख्या श्रद्धेच्या दर्शनाने अंकुश खीलारी आणि त्यांची बैलजोडी संपूर्ण क्षेत्रात चर्चेचा विषय बनली.विशेष म्हणजे, त्यांच्या सोन्या आणि छब्या या बैलजोडीसोबत सहा बॉडीगार्डही उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply