Maharashra Politics : शिंदेंचा सत्कार, मविआत हाहाकार; शरद पवारांवर ठाकरे नाराज

Maharashra Politics : दिल्लीतील कार्यक्रमात शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं तोंडभरुन कौतूक केलं ाणि साहजिकच त्याचे तीव्र राजकीय पडसादही उमटले...एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलं, असं पवार म्हणाले आणि ठाकरे गट अस्वस्थ झाला...

जाहीर कार्यक्रमात थेट शिंदेंचं कौतूक केल्याने ठाकरे गटाने थेट शरद पवारांवर निशाणा साधलाय... शिंदेंचा सत्कार म्हणजे शाहांचा सत्कार असल्याची टीका राऊतांनी केलीय... तर ठाकरेंनी अजितदादांचा सत्कार केला त्यावेळी आम्ही आक्षेप घेतला का? असा सवाल करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पलटवार केला. शरद पवारांकडून शिंदेंचा सत्कार म्हणजे अमित शाहांचा सत्कार, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.

Pune : पुण्यात कोयत्याची दहशत संपेना, सिंहगडाच्या पायथ्याशी तरूणावर कोयत्याने सपासप वार

पवारांवर ठाकरे नाराज

ठाकरेंकडून दादांचा सत्कार, त्यावर आम्ही आक्षेप घेतला का? असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी केला. संजय राऊतांच्या पवारांवरील टीकेनंतर शिंदे गट आणि भाजपला आयतं कोलित मिळालंय...पवारांची भूमिका पटत नसेल तर ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची हिंमत दाखवावी, असं थेट आव्हानच शिंदे गटाने दिलं. शरद पवारांची भूमिका पटत नसेल तर उबाठाने मविआ सोडावी, असे मंत्री शंभुराज देसाई म्हणाले.

केंद्रातलं एनडीए सरकार नितीश कुमार, चंद्रबाबू, एकनाथ शिंदे यांच्या कुबड्यावर आहे... मात्र तरीही राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर भाजपकडून शिंदेंवर कुरघोडीचं राजकारण केलं जात असल्याची चर्चा आहे.. त्यामुळे शिंदे नाराज आहेत.. तर दुसरीकडे ठाकरेंकडून स्वबळाचा नारा देत महाविकास आघाडीत दबावाचं राजकारण केलं जातंय.. नेमकं हेच हेरुन पवारांनी दिल्लीत शिंदेंचा सत्कार केलाय का? असा प्रश्न उपस्थित होतोय.. याबरोबरच पवार शिंदेंची ही कृती सुसंस्कृत राजकारणाचं कारण आहे की दबावाचं राजकारण? याकडे देशाचं लक्ष लागलंय.

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply