महालक्ष्मी एक्सप्रेस 5 जूनपासून विद्युत शक्तीवर धावणार

सांगली : कोल्हापूर– मुंबई रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. या मार्गावर मुंबई– कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस 4 जूनपासून नियमितपणे धावणार आहे.. तसेच कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस 5 जूनपासून विद्युत लाईनवर नियमितपणे धावणार असल्‍याची माहिती रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. 

कोल्हापूर मुंबई या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पुर्ण झाले आहे. त्या मार्गावर मधल्या काळामध्ये चाचणी घेण्यात आली होती. ती यशस्वीरीत्या झाली आहे. या मार्गावर काही गाड्या धावल्या होत्या. तसेच रेल्वे रुळाच्या कामादरम्यान चेन्नई एक्सप्रेस मधल्या काळामध्ये धावली होती. आता मुंबई– कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस 4 जूनपासून धावणार आहे. तर कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस 5 जूनपासून नियमितपणे धावणार आहे.

प्रवाशांना चांगली सुविधा मिळणार असून यामुळे वेळेमध्ये बचत होईल. तसेच रेल्वे क्रॉसिंगमध्ये होणारा विलंबही टाळता येणार आहे. भविष्यामध्ये या मार्गावर एक्सप्रेसही धावतील. यामुळे सांगली सातारा जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार असून प्रवाश्याची बचत होणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply