Maha Shivaratri : दर्शनावरून राडा! घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची हाणामारी, लाथा-बुक्यांनी कोपऱ्यात घालून चोपला, व्हिडीओ व्हायरल

Chhatrapati Sambhajinagar Maha Shivaratri : छत्रपती संभाजीनगरातील घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. सकाळपासून शंकाराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. पण याचवेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा गोंधळ उडाल्याचेही पाहायला मिळाले. दर्शनासाठी रांगेत उभे असणाऱ्या तरूणांची जबर हाणामारी झाली. भाविकांनी एकमेंकाना लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. सोशल माीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दर्शनाच्या रांगेत पुढे जाण्यासाठी भाविकांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाली. तर व्हीआयपी दर्शन रांगेतून विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे सहकुटुंब जात होते, त्यावेळी सार्वजनिक रांगेत उभे असलेले काही भाविक बॅरेगेट्स ओलांडून दानवे यांच्या मागे गेले. हा गोंधळ पाहून दानवे देखील माघारी परतले.

Cancer Death : चिंताजनक! ५ पैकी ३ कॅन्सर रूग्णाचा भारतात मृत्यू, ICMR चा दावा

काही वेळ बाहेर थांबले होते. पोलीस आणि प्रशासनातील समन्वयांचा अभाव व नियोजनाचा अभाव या माध्यमातून दिसून आल्याची टीका दानवे यांनी केली. दिवसभरात नागरिकांचा फ्लो वाढेल त्यामुळे व्यवस्था चांगली करावी, अशी सूचना यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.

Chhatrapati Sambhajinagar - सिद्धेश्वर मंदिर महाशिवरात्री

बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वराच्या मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने आज पहाटेपासूनच शिवभक्तांनी मोठी गर्दी केली आहे. भक्तांच्या हाकेला धावून येणारे आणि भक्तांची मनोकामना पूर्ण करणारे ज्योतिर्लिंग म्हणून घृष्णेश्वरांची ओळख आहे. चार धाम सप्त पुरी, ११ ज्योतिर्लिंग यांची यात्रा केल्यानंतर बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वरांचे दर्शन करून यात्रा पूर्ण करतात. आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने हा योग मोठा असल्यामुळे देशभरातल्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने शिव भक्त वेरूळमध्ये रात्रीच दाखल झालेले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply