Madhya Pradesh Fire : मध्य प्रदेशच्या सरकारी इमारतीला आग; मुख्यमंत्र्यांनी एअरफोर्सकडे मागितली मदत

Madhya Pradesh Fire : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये सातपुडा ह्या सरकारी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवणं अवघड झालं आहे. आता ही आग विझवण्यासाठी आर्मीनंतर एअरफोर्सची मदत मागितली आहे.

आज रात्री एअरफोर्सचे हेलिकॉप्टर आणि विमान भोपाळमध्ये पोहोचणार आहेत. भोपाळचे पोलिस आयुक्त आणि डीएम स्वतः घटनास्थळी उपस्थित आहेत. ही आग सहाव्या माळ्यापर्यंत पोहोचली आहे.

सातपुडा भवनाच्या तिसच्या मजल्यावर सुरुवातीला आग लागली होती. त्यानंतर आगीने रौद्र रुप धारण केलं. आग लागताच संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार एसीमध्ये स्फोट झाल्याने आग लागली. या आगीत इमारतीमधील महत्त्वाची कागदपत्रे आणि फर्निचर जळून खाक झालं.

आगीनंतर फायर ब्रिगेडच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अजूनही आग विझवण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. सर्व प्रयत्न सुरु असतांनाच मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी संरक्षण मंत्रालयाशी बातचित करुन आग विझवण्यासाठी एअरफोर्सची मदत मागितली आहे. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी एअरफोर्सला मदत करण्याचे निर्देश दिले.

आज रात्री AN 32 विमान आणि MI 15 हेलिकॉप्टर भोपाळला पोहोचतील. AN 32 आणि MI 15 हेलिकॉप्टरने बकेटद्वारे सातपुडा भवनच्या वरती पाणी फेकण्यात येईल. त्यामुळे रात्रभर भोपाळ एअरपोर्ट चालू राहणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply