Madhya Pradesh : मध्य प्रदेश हादरलं! ७ जणांनी बायकोची छेड काढून केली मारहाण, नवऱ्याने २ मुलांसह जीवन संपवलं

Madhya Pradesh : मध्य प्रदेशमधून खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका पित्याने दोन मुलांसह गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या तिघांचे मृतदेह आंब्याच्या झाडावर लटकलेले आढळले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या  शामगड ठाणे क्षेत्राच्या रुंडी गावात ही घटना घडली आहे. एका व्यक्तीने मुलगा आणि मुलीसोबत जीवन संपवलं आहे. या व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी देखील लिहिलं आहे. 

Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीच्या जळगाव, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला; उमेदवार कोण?

आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत काय लिहिलं?

आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत म्हटलं आहे की, 'तीन महिन्यांपूर्वी पत्नी नैनी हिची गावातील राजू, कालू, सोनू, गीताबाई, नोजीबाई, लीलाबाई, गोविंद यांनी मारहाण करून छेड काढली. तसेच त्यांनी या सर्वांना स्वत :च्या आणि मुलांच्या मृत्यूला जबाबदार धरलं आहे. तसेच या चिठ्ठीत पोलिसांकडून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

नेमकं काय घडलं?

मृत व्यक्तीचा आरोप होता की, पत्नीला गावातील एकाच कुटुंबातील महिला आणि पुरुषांनी मारहाण केली आणि छेड काढली. नैनी हिचा पती रविवारी सांयकाळी तीन महिन्यानंतर घरी पोहोचला. घरी पोहोचल्यानंतर मुलांनी शामगडमधून शॉपिंग केली. त्यानंतर मंगळवारी सकाळी या तिन्ही जणांचा मृतदेह गावातील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला.

पोलिसांकडून तपास सुरु

तिघांनी आत्महत्या केल्यानंतर मृत व्यक्तीची पत्नी आणि त्यांचे नातेवाईक पोलिसांत धाव घेऊन कारवाईची मागणी केली. मृतकांच्या नातेवाईकांनी आरोपीच्या घरी पोहोचून त्याच्या घराची तोडफोड केली आहे. मृतकांच्या नातेवाईकांनी पोलिसांशी देखील हुज्जत घातली.

या घटनेनंतर पोलिसांनी मृतांच्या आरोपींना शांत करत मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे. या प्रकरणातील आरोपी फरार असल्याचे समोर आलं आहे. या घटनेने परिसरात गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या फरार आरोपींचा तपास सुरु केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply