M. S. Dhoni : MS धोनीसंदर्भात IPL मधील निवृत्तीवरून CSK चे मालक काशी विश्वनाथन यांचं मोठं वक्तव्य

M. S. Dhoni : चेन्नई सुपर किंग्स आयपीएल 2024 मधून बाहेर पडताच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. यानंतर धोनी आयपीएलमधून निवृत्त होणार का हा सर्वात मोठा प्रश्न चाहत्यांना पडला होता. धोनी पुढच्या हंगामात खेळणार की नाही? हाच प्रश्न चेन्नई सुपर किंग्जचे मालक कासी विश्वनाथन यांनाही विचारण्यात आला असून त्यांनी त्यांचं उत्तरही दिलं आहे. धोनी पुढील हंगामात खेळू शकतो, असे संकेत काशी विश्वनाथनने दिले आहेत. चेन्नई सुपर किंग्सने याचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

धोनीच्या निवृत्तीच्या प्रश्नावर कासी विश्वनाथन म्हणाला, 'तुम्हा सर्वांना माहिती आहे की धोनी त्याचे सर्व निर्णय स्वत: घेतो आणि योग्य वेळीच त्याची घोषणा करतो. तो ज्यावेळी निर्णय त्यानंतरच आम्हाला त्याचा निर्णय कळेल. पण मला आणि चाहत्यांना आशा आहे की धोनी पुढच्या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडूनच खेळेल.

Dinesh Karthik Retirement : १६ वर्ष, ६ संघ आणि एक पुरस्कार; दिनेश कार्तिकची IPLमधून निवृत्ती

धोनी दुखापतीसह संपूर्ण आयपीएल सीझन खेळला आहे आणि तो उपचारासाठी लंडनला जाऊ शकतो, असं वृत्त आहे. धोनी पुढील हंगामात खेळू शकेल की नाही हे उपचारानंतरच कळेल. धोनीकडे अजून बराच वेळ आहे. धोनीचा जिवलग मित्र सुरेश रैनानेही या धोनीने पुढच्या हंगामात खेळावं, असं म्हटलं आहे.

धोनीची फलंदाजी आणि यष्टीरक्षणाबाबत बोलायचं झालं तर त्याने या हंगामातही आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. धोनीने या मोसमात 110 च्या सरासरीने 110 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेटही 230 च्या आसपास होता. फिनिशरच्या भूमिकेत त्याने उत्कृष्ट भूमिका निभावली आहे. मात्र सध्या तो पायाच्या दुखापतीने त्रस्त आहे. याचं उत्तर मिळाल्यावर धोनीचा पुढचा निर्णय स्पष्ट होईल, असं काशी विश्वनाथन यांनी म्हटलं आहे.
 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply