Luna 25 Crashed : रशियाची चांद्रमोहीम फेल; 'लूना 25' चंद्रावर झालं क्रॅश!

Luna 25 Crashed : रशियाच्या चांद्र मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. 'लूना 25'चंं लँडर हे चंद्रावर क्रॅश झालं आहे. रशियाची स्पेस एजन्सी रॉस्कॉस्मॉसने याबाबतची माहिती दिली. यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिला देश ठरण्याचं रशियाचं स्वप्न भंगलं आहे. सोमवारी (21 ऑगस्ट) लूना 25 हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करणार होतं. मात्र त्यापूर्वी शनिवारी यामध्ये काही तांत्रिक अडचणी समोर आल्या होत्या. यानंतर हा बिघाड दुरुस्त कऱण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, त्यातच हे लँडर चंद्रावर कोसळलं असल्याचं रशियाने सांगितलं.

47 वर्षांनंतर प्रयत्न

1976 साली पार पडलेल्या Luna 24 या मोहीमेनंतर तब्बल 47 वर्षांनी रशियाने ही चांद्रमोहीम राबवली होती. यामुळेच लूना 25 कडून रशियाला मोठ्या आशा होत्या. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचं अस्तित्व शोधून, त्याठिकाणी पुढील एक वर्षांपर्यंत संशोधन करण्याच्या उद्देश्याने लूना-25 चं प्रक्षेपण करण्यात आलं होतं.

Narendra Dabholkar Case : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 10 वर्ष पूर्ण; जिथं हत्या झाली त्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून अंनिसचा निर्धार मोर्चा

कशामुळे झाला अपघात?

शनिवारी (19 ऑगस्ट) लूना-25 ला चंद्राच्या आणखी जवळच्या ऑर्बिटमध्ये नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होता. लँडिंगसाठी ही प्रक्रिया आवश्यक होती. मात्र, यावेळी लूना-25 च्या लँडरमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या. यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. यानंतर पुन्हा प्रयत्न करताना लूनाचं लँडर चंद्राच्या अनियोजित कक्षेत पोहोचलं. यानंतर लँडरचा ताबा सुटला आणि ते चंद्रावर क्रॅश झालं.

यानंतर रॉस्कॉस्मॉसमधील वैज्ञानिक सातत्याने लँडरचा शोध घेण्याचा आणि त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र या प्रयत्नांना यश मिळालं नाही. अखेर ही मोहीम अयशस्वी झाल्याचं रॉस्कॉस्मॉसने आपल्या अधिकृत टेलिग्राम चॅनलवरून स्पष्ट केलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply