
Love Jihad Committee : ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाच्या तक्रारी प्रकरणी महिला व बालविकास विभागाने गठीत केलेली ‘आंतरधर्मीय विवाह-परिवार समन्वय समिती’ रद्द करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संबधित विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांना तसे पत्र आमदार शेख यांनी दिले. "राज्यात लव्ह जिहादची एक लाखांपेक्षा अधिक प्रकरणे आहेत, असा दावा लोढा यांनी केला होता. मात्र, समितीकडे आजपर्यंत केवळ 402 तक्रारीच प्राप्त झाल्याच माहिती अधिकारातून समोर आले आहे. या तक्रारीमध्ये केवळ दोन विशिष्ट समुदायाची जोडपी नसून, सर्वधर्मीय जोडपी आहेत. त्यामुळे, 'लव्ह जिहाद' प्रकरणी गठीत केलेली समिती रद्द करा अशी मागणी आमदार रईस शेख यांनी केली आहे.
यावेळी देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, "महिला व बालविकास यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय, अशासकीय सदस्यांची आंतरधर्मीय विवाह- परिवार समन्वय समिती (राज्यस्तरीय) नेमण्यात आली आहे. तर, मुस्लिम तसेच अल्पसंख्याक समाजावर अन्याय होऊ देणार नाही, अशी आपण कायम भूमिका घेत आला आहात. मात्र, तत्कालीन महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा सदर समिती स्थापन करण्यामागचा हेतू विशिष्ट समाजाविषयी गैरसमज निर्माण करणे, समाजात धार्मीक तेढ वाढवणे, अल्पसंख्याक समाजाला जाणूनबुजून त्रास देणे आणि विभागाकरवी चुकीचे धोरण राबविणे असा असल्याचे प्राप्त तक्रारींच्या अत्यल्प संख्येने सुस्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे एका विशिष्ट समाजाला बदनाम करणे हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी परंपरेचा आणि शाहू-फुले- आंबेडकर यांचा वारसा असणाऱ्या राज्याला शोभणारे नाही, असे आमदार रईस शेख यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
|
|
लोढा यांनी खोटी माहिती दिली?
तसेच, तत्कालीन महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत 8 मार्च 2023 रोजी बोलताना राज्यात 'लव जिहाद'ची 1 लाख प्रकरणे असल्याचे तसेच आंतरधर्मीय विवाहाची 3 हजार 693 प्रकरणे असल्याचे सांगितले होते. मंत्री महोदयांचे हे वक्तव्य निराधार असून कुठल्याही आधाराशिवाय एका समाजघटकावषियी गैरसमज निर्माण करून विशिष्ट समुदायास बदनाम करण्याच्या हेतूने केल्याचे अधोरेखीत होते. यासंदर्भात आंतरधर्मीय विवाह-परिवार समन्वय समितीकडे प्राप्त तक्रारींची माहिती आयुक्त महिला व बालविकास, पुणे यांच्याकडून मी स्वतः माहिती मागवली होती. त्यांनी या समितीकडे प्राप्त तक्रारीची संख्या 'निरंक' असल्याची माहिती दिली आहे. तसेच, माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त झालेल्या माहितीनुसार समिती स्थापनेपासून आतापर्यंत समितीच्या फक्त 3 बैठका झाल्या आहेत. या समितीकडे एकूण 402 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये हिंदू-मुस्लीम धर्मीय जोडप्या बरोबरच इतर धर्मीय जोडप्यांचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे, या पत्राद्वारे मी आपणाकडे मागणी करतो की, सदर समिती आणि त्याबाबत काढलेला शासन निर्णय शासनाने त्वरित रद्द करण्याची आपण घोषणा करावी. अल्पसंख्याक समाजाच्या न्याय हक्काचे रक्षण होईल, अशी आपल्या नैसर्गीक स्वभावानुसार आपण ठाम भूमिका घ्याल, अशी मला अपेक्षा असल्याच देखील आमदार शेख यांनी म्हटले आहेत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले




























Subscribe to my channel

