गडकरी अन् राज ठाकरेंची पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्तभेट अन्.. २०१४ मध्ये का नाही झाली मनसे-भाजप युती?

Loksabha Election 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती आता जवळपास नक्की समजली जात आहे. आजच शिंदे-फडणवीस आणि राज ठाकरे यांची बैठक झाली.

तर काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक निवडणुकांमध्ये ही युती दोन्ही पक्षांसाठी फायद्याची असल्याचेच चित्र आहे.

मात्र २०१४ लाच राज ठाकरे आणि भाजपची युती नक्की झाली होती पण उद्धव ठाकरेंमुळे ती बिनसली हे तुम्हाला माहीत आहे का?

IPL 2024 च्या एक दिवसआधी गुजरात टायटन्सची मोठी घोषणा! मोहम्मद शमीच्या जागी खेळणार 'हा' पठ्ठ्या

हा राजकीय किस्सा आहे साल २०१४चा. जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते नरेंद्र मोदी त्यावेळी राज ठाकरेंनी गुजरात दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी मोदींचे तौंडभरुन कौतुक केलं. त्यावेळी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाच्या क्षमतेचे नेते आहेत. असे राज ठाकरे देशात पहील्यांदा म्हणाले होते. त्यानंतर मोदी आणि ठाकरेंची किंबहुना भाजपची जवळीक चांगलीच वाढली होती.

त्यावेळी लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजेच मार्च महिन्यात भाजपचे माजी पक्षाध्यक्ष आणि आताचे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांची आणि राज ठाकरे यांची मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाली होती. मनसेने युतीविरोधात उमेदवार उभे करू नयेत अशी विनंती ठाकरेंना गडकरींनी केली होती.

भाजपने राज यांना आकर्षक पर्याय दिला होता. मनसेने उमेदवार उभे न करण्याच्या बदल्यात मनसेला राज्यसभेच्या दोन जागा आणि आगामी विधानसभा निवडणुकीत तीस ठिकाणी उमेदवारी दिली जाणार होती. मात्र त्यावेळी अखंड शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेले आणि राज ठाकरेंचे मोठे बंधु उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावाला विरोध केला होते 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply