Loksabha Election : लोकसभा डोळ्यापुढं ठेवूनच राजू शेट्टींचं ऊसदराचं आंदोलन, गेली चार वर्षे का सुचलं नाही? ज्येष्ठ नेत्याचा सवाल

Loksabha Election : आगामी लोकसभेच्या निवडणुका  डोळ्यापुढे ठेवून राजू शेट्टी राजकीय भवितव्यासाठी ऊसदराचे आंदोलन करीत आहेत. संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेट्टी यांचे आंदोलन शेतकऱ्यां‍चे नुकसान करणारे असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे यांनी पत्रकार बैठकीत केला.

डांगे म्हणाले, ‘गतवर्षीच्या बिलापोटी ४०० रुपये आणि यंदाच्या उसाला प्रतिटन ३५०० या मागणीसाठी ऊसतोड रोखून ठेवत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. पाण्याच्या कमतरतेने आधीच उसाची घट झाली आहे. अशात आंदोलनामुळे ऊस वाळू लागला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीला सर्वस्वी राजू शेट्टीच जबाबदार आहेत. गेली चार वर्षे माजी खासदार राजू शेट्टी यांना आंदोलन का सुचले नाही.
 
 
लोकसभेच्या तोंडावरच आंदोलन सुचले, ते आता शेतकऱ्यांना समजू लागले आहे. पदयात्रा आणि जयसिंगपूर येथे केलेले ठिय्या आंदोलन करून शेतकरी हिताचे आंदोलन करत असल्याचा दिखावा केला आहे. यावर्षी पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती आहे. उसाची वाढ खुंटली आहे. नदीला पाणी कमी असल्याने मुबलक पाणी मिळालेले नाही. भविष्यातही पाण्याची कमतरता भासणार आहे. कोरोना आणि महापुरामुळे आधीच शिरोळ तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात असून रोजमेळ बसेना झाला आहे.
 
मात्र, शेट्टी हे पुन्हा खासदार होण्यासाठी कारखानदारांना टार्गेट करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र पोळी भाजण्याच्या आगीत शेतकरी पुरता भाजून निघत आहे. त्यामुळे यावर्षी ऊस कोणत्याही परिस्थितीत कारखान्याला घालवण्याच्या दृष्टीने शेतकरी प्रयत्नशील आहे. शेतकरी शेट्टी यांच्या भूलथापांना बळी न पडता आपला ऊस घालवण्यासाठी आता रस्त्यावर उतरणार आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply