Lok Sabha Elections 2024 : काँग्रेसकडून आणखी ६ उमेदवारांच्या नावांची घोषणा; दक्षिण गोव्यातील खासदाराचं तिकीट कापलं

Lok Sabha Elections 2024 : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी आणखी सहा उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. या उमेदवारांमध्ये विरियाटो फर्नांडिस यांच्या नावाचा समावेश आहे. तर दक्षिण गोवा मतदारसंघातील विद्यमान खासदार फ्रान्सिको सारदिन्हा यांचं तिकीट कापल्याची माहिती हाती आली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते सारदिन्हा हे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचीही भूमिका निभावली होती. तर काँग्रेसने उत्तर गोव्यातून रमाकांत खलप यांना उमेदवारी दिली आहे.

मध्य प्रदेशच्या मुरैनामधून सत्यपाल सिंह सीकरवार, ग्वालियरमधून प्रवीण पाठक, खंडवातून नरेंद्र पटेल यांना उमेदवारी दिली आहे. तर दादरा एवं नगर हवेलीतून अजीत रामजी भाई महला यांना तिकीट दिलं आहे. काँग्रेसने आतापर्यंत २४१ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रसने आतापर्यंत उमेदवारांच्या १२ याद्या जाहीर केल्या आहेत. त्यातून २३५ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

Image

देशात १८ व्या लोकसभेची निवडणूक १९ एप्रिलपासून सुरु होणार आहे. या निवडणुकीत २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जून असे अनुक्रमे मतदान असणार आहे. तर मतमोजणी चार जूनला होणार आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply