Lok sabha election results 2024 : नरेंद्र मोदींनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा; राष्ट्रपतींनीही स्वीकारला

Lok sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी हाती आला आहे. एनडीएला २९४ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे देशात पुन्हा एनडीएचं सरकार येईल, हे स्पष्ट आहे. नवीन सरकार स्थापनेपूर्वी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाचा औपचारिक राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपवला आहे. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.

Devendra Fadnavis :'राज्यात भाजपला जनतेने नाकारलं नाही, तर...'; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली पराभवाची कारणे

नवीन सरकार स्थापन होईपर्यंत पंतप्रदान मोदीनीच कार्यवाहक पंतप्रधान म्हणून काम करावं, असे निर्देष राष्ट्रपतींनी दिले आहेत. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांच्या भेटीचे फोटो राष्ट्रपतींनी शेअर केले आहेत. दिल्लीत एनडीएची बैठक होणार आहे, त्यापूर्वीच मोदींनी आपला औपचारिक राजीनामा सुपूर्द केला.

देशभरात भाजपने चारशे पारचा नारा दिला होता. परंतु मतदारांनी त्याला खोड घातली असून एनडीएचे २९४ उमेदवार निवडून आले तर इंडिया आघाडीचे २३४ उमेदवार विजयी झाले असून ८ अपक्षांनी बाजी मारली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply