Lok Sabha Election : लोकसभेसाठी पुण्यात काँग्रेसकडून वीस जण इच्छुक

Lok Sabha Election :  शहर कॉंग्रेसकडून पुणे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची मोठी फौज असल्याचे पक्षाकडे आलेल्या अर्जांवरून समोर आले आहे. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, अनंत गाडगीळ, शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह वीस जणांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत.

दोन महिन्यांवर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. पुणे शहर लोकसभा मतदार संघ महाविकास आघाडीत कॉंग्रेसकडे आहे. निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाने तयारी सुरू केली आहे. या जागेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून पक्षाने रविवारपासून अर्ज मागविले होते.

Political News : 33 देशांनी मुख्यमंत्र्याची नाही तर त्यांच्या गद्दारीची दखल घेतली, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

अर्ज दाखल करण्याचा मंगळवार हा शेवटचा दिवस होता. आजअखेर पक्षाकडे वीस इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये माजी मंत्री, आमदार, शहराध्यक्ष, यांच्यासह प्रदेश कार्यकारिणी असलेल्या पदाधिकाऱ्यांनी इच्छा व्यक्त केली आहे.

प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी, पदाधिकारी अभय छाजेड, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, प्रदेश महिला कॉंग्रेसच्या उपाध्यक्ष संगीता तिवारी, माजी उपमहापौर आबा बागूल, दत्ता बहिरट, संग्राम खोपडे (आर.जे), नरेंद्र व्यवहारे, राजू कांबळे, मुकेश धिवार आणि दिग्विजय जेधे यांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे उमेदवारी मिळविण्यासाठी कॉंग्रेसमध्ये चुरस असल्याचे सध्या तरी यादीवरून दिसून येत आहे.

शहर कॉंग्रेसकडून इच्छुकांची यादी प्रदेश कॉंग्रेसकडे पाठविली जाणार आहे. तर प्रदेश कॉंग्रेसकडून अंतिम यादी अखिल भारतीय कॉंग्रेसकडे पाठविली जाणार आहे. त्यांनतर नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply