Lok Sabha Election : भाजपला बहुमताचा आकडा गाठणं कठीण, अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे. राज्यात महाविकास आघाडीला 32 ते 35 जागा मिळतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच भाजपला बहुमताचा 272 चा आकडा गाठणं अवघड आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

अजित पवार गटावर भाष्य करताना ते म्हणाले की, अजित पवार गटाच्या एकही जागा निवडून येणार नाही. शिंदे गटाच्या 3 ते 4 जागा निवडून येऊ शकतात, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

Vishrantwadi News : सततच्या पावसामुळे म्हाडा कॉलनीत स्लॅब कोसळला, म्हाडातील घरांच्या दुरवस्थेमुळे नागरिक भयभीत

महाविकास आघाडीबद्दल बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ''महाविकास आघाडीच्या चांगल्या जागा निवडून येतील. तिन्ही पक्षाचे मिळून एकूण 32 किंवा त्यापेक्षा जास्त जागा निवडून येतील, असं मी आता भाकीत करत आहे.''

भाजपच्या 400 पारच्या घोषणेवर चव्हाण म्हणाले, ''400 पार ही फक्त घोषणा आहे. विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहिला तर, भारतीय जनता पक्ष नेहमीच वाढून आकडा सांगता आला आहे. यात त्यांनी 200 पार, 300 पारच्या घोषणा दिल्या, मात्र प्रत्यक्षात निम्म्यापेक्षा कमी जागा त्यांच्या निवडून आल्या. ''

पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, ''ही निवडणूक पूर्ण वेगळी झाली आहे. त्यांना देशात 272 जागा मिळणार नाही. त्यांना 370 जागा संविधान बदलायला हव्यात का? अशीही चर्चा आहे. मुस्लिम, दलित यांना संविधान बदलायची भिती वाटते.''



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply