Lok Sabha Election : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट ; 'MIM'चा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, लढत तिरंगी होणार

Lok Sabha Election : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील राजकारण तापलं आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून अरविंद सावंत तर शिंदे गटाकडून यामिनी जाधव निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात दुरंगी लढत होणार, अशी चर्चा होती. या लढाईत आता 'एमआयएम'ने एन्ट्री केली आहे. याबाबत वारीस पठाण यांनी उमेदवाराविषयी माहिती दिली. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी निवडणूक होण्याची शक्यता आहे.

एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांना पक्षाकडून तिकीट मिळाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर टीका केली. वारीस पठाण म्हणाले, 'महाविकास आघाडी एक तरी उमेदवार मुस्लीम देतील असे वाटले होते. पण तसे झाले नाही. त्यामुळे आम्ही आता मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातूनअर्ज भरत आहोत. मला सांगितले होते की, तुम्ही लढा. पण मी बोलले होते की प्रचार करेन'.

'ॲडव्होकेट रमजान चौधरी हे या ठिकाणाहून अर्ज करत आहेत. ते आमचे उमेदवार आहेत. एकाला जळगावमधला उमेदवार आणावा लागला आहे. एकाला बाहेरून उमेदवार आणावा लागला आहे. आम्ही त्यांच्या बरोबर इंडीया अलाएन्समध्ये नाही. हे दोघेही सारखेच आहे. बी टीमचा आरोप निराधार आरोप आहे. आम्हाला तुम्हाला काय म्हणायचे आहे ते म्हणा. त्याने आम्हाला फरक पडत नाही, असे ते म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply