Lok Sabha Election : मुंबईतील १० जागांसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरूवात; अद्यापही मविआ आणि महायुतीत काही जागांवर तिढा कायम

Lok Sabha Election : मुंबईसह ठाणे, पालघरच्या १० जागांसाठी आजपासून (शुक्रवार) अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व आणि मुंबई  उत्तर मध्य यांसह ठाणे, भिवंडी आणि कल्याण या १० लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरता येणार आहे. उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची दिनांक ३ मे आहे. ३ मेपर्यंत या १० जागांसाठी अर्ज दाखल करता येणार आहेत.

महामुंबईतील १० जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी देखील अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीने काही जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. दक्षिण मुंबईमध्ये महाविकास आघाडीकडून अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आलीये. तर महायुतीचा या जागेसाठीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. अशात आज ईशान्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं समजलं आहे.

Lok Sabha Election : मावळमध्ये ३८ जणांचे अर्ज दाखल; ‘संजोग, वाघेरे’ नामसाधर्म्य असलेले दोन उमेदवार रिंगणात

मुंबईत उमेदवारांना या ठिकाणी अर्ज भरता येणार

मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य या तीन जागांसाठी प्रशासकीय इमारत, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय यासह मुंबई उत्तर पूर्वचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय, मुंबई दक्षिण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय विक्रोळी (पूर्व) त्याचप्रमाणे मुंबई दक्षिण मध्य, गोदरेज कॉलनी येथे उमेदवारांना आपला अर्ज दाखल करता येणार आहे.

निवडणूक वेळापत्रक

२६ एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरुवात

३ मेपर्यंत अर्ज दाखल करता येणार

४ मेला सर्व अर्जांच छाननी होणार

६ मे अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

२० मे मतदान प्रक्रिया पार पडणार

४ जून मतमोजणी होणार



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply