Lok Sabha Election : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात महायुतीपुढे मोठा पेच; रविंद्र वायकरांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध

Lok Sabha Election :  महाविकास आघाडीकडून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या मतदारसंघात अमोल कीर्तिकर यांनी उमेदवारीनंतर प्रचारालाही सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे महायुतीकडून या लोकसभा मतदारसंघात उमेदवार निश्चित झालेला नाही. या मतदारसंघात ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेल्या रविंद्र वायकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मात्र, या मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी रविंद्र वायकरांना उमेदवारी देऊ नका, असं म्हणत विरोध केला आहे. यामुळे या मतदारसंघात महायुतीपुढे मोठा पेच उभा राहिला आहे.

महायुतीमध्ये काही जागांवरून जागावाटपाचा तिढा कायम आहे. या जागांमध्ये मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या लोकसभा मतदारसंघातून अभिनेते गोविंदा यांच्या नावाचीही चर्चा होती. त्यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटा प्रवेश केला होता. आता या मतदारसंघातून रविंद्र वायकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.

रविंद्र वायकर यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या चर्चेदरम्यान रविंद्र वायकर यांच्या उमेदवारीला भाजप कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे.

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी रविंद्र वायकरांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत रविंद्र वायकर यांना उमेदवारी देण्यावर चर्चा झाली. मात्र, यानंतर घोटाळ्याचे आरोप असलेल्या रविंद्र वायकरांना उमेदवारी देऊ नका, असा सूर भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा आहे

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply