Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त २८५ कर्मचाऱ्यांची ट्रेनिंगला दांडी; गैरहजर कर्मचाऱ्यांना बजावणार नोटिस

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची देखील तयारी सुरु आहे. निवडणुकीसाठी प्रशासनातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून यासाठी कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिले जात आहे. मात्र  नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी २८५ कर्मचारी हे गैरहजर राहिले. यामुळे या कर्मचाऱ्यांना नोटीस बजाविण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा मतदार संघनिहाय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले जात आहे. दोन्ही दिवसांच्या दोन्ही सत्रांत ईव्हीएम मशीनबाबत पी.पी.टी. दाखवण्यात आली. त्यात मतदान यंत्र कसे सेटिंग व सीलिंग करावे, याबाबत माहिती निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक देण्यात आली. तसेच मतदानाच्या दिवशी आवश्यक ते फॉर्म कसे भरावेत त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याच वेळी निम्म्या प्रशिक्षणार्थ्यांना इव्हीएमचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले होते.

Nandurbar News : बेकायदा जमीन हडपल्याचा आरोप; संतप्त शेतकऱ्यांचा सुजलोन कंपनीत ठिय्या

दरम्यान नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण घेण्यात आले. दोन्ही दिवस मिळून तब्बल २८५ कर्मचारी गैरहजर राहिले. या कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. या कर्मचाऱ्यांना या नोटिसीचे उत्तर द्यायचे आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply