Lok Sabha Election 2024 : मावळ लोकसभा मतदारसंघात मराठा समाज निवडणूक लढणार, प्रत्येक गावातून असणार दोन उमेदवार

Lok Sabha Election 2024 : मावळ लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाकडून उमेदवार देण्याचा निर्णय आज (बुधवार) मराठा समाजाने घेतला आहे. यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात लाेकसभा निवडणूकीत महायुती  महाविकास आघाडी आणि मराठा समाजाचे उमेदवार असतील अशी शक्यता सध्या तरी निर्माण झाली आहे. 

मावळ तालुका सकल मराठा समाजाची बैठक लाेणावळा येथे झाली. या बैठकीत एकमताने मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक गावातून 2 उमेदवार देण्याची चर्चा आजच्या बैठकीत करण्यात आली.

Ahmednagar Renamed As Ahilyanagar : अहमदनगर नव्हे, आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

मावळ लोकसभा मतदारसंघात चिंचवड, मावळ, कर्जत मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या मतदानाचा प्रभाव हा उमेदवारांना दिसून येणार आहे. 

मावळ लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाकडून उमेदवार देण्यात येणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात मराठा समाज हा स्वतंत्र उमेदवार देत असल्याने आता सर्वच पक्षांची गणित बिघडण्याची शक्यता आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply