Lok Sabha Election 2024 : नंदुरबारमधील ९ हजार मतदार घरबसल्या करणार मतदान

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यासाठी प्रशासनाची देखील जोरदार तयारी सुरु असून या  लोकसभा निवडणूकीत मत घेण्यासाठी मतदान कर्मचारी आपल्या दारी असणार आहेत. यात नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास ९ हजार मतदार हे घरी राहूनच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

मतदान करण्याची इच्छा असतानाही वय, आजार आणि दिव्यांगत्वामुळे मतदान केंद्रापर्यंत जाता येऊ शकत नाही. असे मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहतात. त्यामुळे अशा मतदारांसाठी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत घरी राहून मतदान करण्याची सोय करण्यात येणार आहे. जवळपास नऊ हजार मतदार अशाप्रकारे मतदान करू शकतील. अर्थात जिल्हा प्रशासनाकडून त्यासंबधिती माहिती गोळा करत तशी तयारी करण्यात येत आहे. 

Nashik Politics : छगन भुजबळांना नाशिकमधून लोकसभा उमेदवारी जवळपास निश्चित; पुढील ४८ तासात निर्णय होणार

पाहणी करून भरला जाणार अर्ज 

संबंधित मतदारांकडून आधी अर्ज भरून घेतला जाणार आहे. खरंच मतदार मतदान केंद्रापर्यंत येऊ शकण्यास असमर्थ आहे का? याची पहाणी केली जाईल. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल. यासाठी मतदान कर्मचाऱ्यांची टीम संबंधित घरी जातील. मतपत्रिका, ठसा, मतपेटी, गोपनीय पद्धतीने मतदान करता येईल; असा आडोसा असलेले साहित्य सोबत राहणार आहे. यामुळे वयोवृद्ध व विकलांग नागरिकांना याच्या फायदा होणार आहे तसेच मतदानाची टक्केवारी देखील वाढणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply