Lok Sabha Election : महायुतीच्या उमेदवारांचे टेन्शन वाढणार? आठवलेंना डावलल्याने RPIचे कार्यकर्ते आक्रमक, दिला मोठा इशारा

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये काही जागांवरून तिढा कायम आहे. नाशिकमधून उमेदवारी मिळवण्यासाठी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे आग्रही आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी रामदास आठवलेंनी शिर्डीची जागा मिळावी, यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, महायुतीकडून आठवलेंना शिर्डीची जागा मिळाली नाही, यामुळे आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

महायुतीने आरपीआय आठवले शिर्डीची जागा न सोडल्याने आठवले गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाने उमेदवार मागे घेऊन शिर्डीचा जागा रामदास आठवले यांना सोडावी, अन्यथा आरपीआय शिर्डी आणि अहमदनगर दक्षिण मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचा निर्धार रिपाईच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे.

Navi Mumbai Fire : नवी मुंबईत केमिकल कंपनीला भीषण आग; सर्वत्र धुराचे लोट, अग्निशमन दल घटनास्थळी

आरपीआयचे अध्यक्ष  रामदास आठवले हे सुरूवातीपासून शिर्डी मतदारसंघासाठी आग्रही होते. मात्र ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला देण्यात आली असून उमेदवारही जाहीर करण्यात आला आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील आरपीआय कार्यकर्ते आजही आग्रही आहेत. त्यामुळे श्रीरामपूर येथे निर्धार मेळावा घेत शिर्डीचा उमेदवार बदलावा. तसेच ही जागाआठवलेंना सोडली जावी, अशी मागणी करत कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

देवेंद्र फडवणवीस यांच्या भेटीनंतर रामदास आठवले काय म्हणाले होते?

शिर्डीसाठी आग्रही असलेल्या रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर म्हणाले होते की, 'शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आमचा आग्रह होता. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना अडचण होती. या जागेसाठी फडणवीसांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला. शिंदे यांच्यासोबत खासदार आले होते, त्यांना त्यांनी आश्वासन दिलं होतं. फडणवीस यांना २०२६ ला माझी राज्यसभा संपते. त्यांनी मला पुन्हा राज्यसभेवर पाठवणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय राज्यमंत्रिपद आहे.आता कॅबिनेट मंत्रिपदासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply