Lok Sabha Election : नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची नाका बंदी; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होतेय तपासणी

Lok Sabha Election : देशात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे प्रशासन देखील अलर्ट झाले आहे. आता  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील सीमेवरती पोलिसांनी कडक बंदोबस्त लावण्यात आला असून वाहनांची तपासणी केली जात आहे.

लोकसभा निवडणूक लागल्याने प्रशासन देखील कामाला लागले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांमधून काही रक्कम नेण्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे पोलीस प्रशासनाकडून सीमावर्ती भागात तपासणी देखील सुरु करण्यात आली आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्याला तेलंगणा, कर्नाटक या राज्यांची सीमा लागून आहे. जिल्ह्यातील बिलोली, देगलुर, धर्माबाद, भोकर, किनवट, माहुर यासह इतर तालुक्यातून तेलंगणा आणि कर्नाटक राज्यात महामार्ग जातात. यामुळे पोलीस प्रशासनाकडून सर्व सीमावर्ती भागात नाकाबंदी करण्यात आली आहे. 

Maharashtra Loksabha Election : राज ठाकरेंच्या मनसेला कुठे संधी? एका जागेवर तयारी, दुसऱ्या ठिकाणी विरोध

वाहनांची कसून तपासणी 

नांदेड जिल्ह्यातून अन्य राज्यात जाणाऱ्या या महामार्गावरून नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. यासाठी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. प्रत्येक वाहनांच्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर असून त्यांची तपासणी केली जात आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply