Lok Sabha Election : "ज्याच्या त्याच्या मरणाने तो मरेल, पण आपण..."; अजित पवारांबद्दल CM शिंदे-शिवतारेंमध्ये चर्चा

Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुक २०२४ च्या पार्शभूमीवर राजकीय वातावरण तापत असतानाचं शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणुक लढवण्यावरून महायुतीत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. यादरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारेंची भेट घेतली. या भेटीनंतर शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं याबद्दल माध्यमांना माहिती दिली.

शिवतारे म्हणाले की, स्वतःची सत्ता आणि सत्तेतून मिळालेली अराजकता झाली आहे, ती मोडण्यासाठी जनतेची इच्छा आहे. म्हणून मी उभं राहण गरजेचं आहे हे मी त्यांना समजावून सांगितलं. सगळी गणितं समाजवून सांगितली. यामधून निश्चितपणे चांगला रिझल्ट येऊ शतो. मी असंही सांगितलं की, मी जरी नसलो तरी अजित पवार निवडणून येणार नाहीत आणि ती युतीची सीट जाणारचं आहे. त्यामुळे फेरविचार करावा असेह मी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणींत वाढ; शिरूर पोलिसांनी बजावली नोटीस, बीडमध्ये ९ गुन्हे दाखल

त्यामुळे त्यांचं आपापसात काय होईल ते होईल ... ज्याच्या त्याच्या मरणाने तो मरेल... पण आपण धनी नको व्हायला असं त्यांनी (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) मला सांगितलं. ही अन्यायाविरोधातील लढाई बारामती मतदारसंघातील प्रत्येकाची आहे, ही लढाई पवार विरुद्ध सामान्य जनता अशी आहे. आपण मला थांबवू नका असंही मी त्यांना सांगितलं. पण त्यांनी पुन्हा आपल्याला ऐकावं लागेल, युतीचा धर्म पाळावा लागेल असं सांगितलं. त्यामुळे दोन-चार दिवस वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा करतो त्यानंतर आपण ठरवू असे मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे विजय शिवतारे म्हणाले.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply