Local Accident : धावत्या लोकलमधून पडून आणखी एकाचा बळी, अंबरनाथहून उल्हासनगरला जात असताना अपघात; जागीच मृत्यू

Local Accident : उल्हासनगर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकागदरम्यान, एक दुर्देवी रेल्वे अपघात घडला आहे. या भीषण रेल्वे अपघातात तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत तरूण अंबरनाथ येथील रहिवासी असून, तो अंबरनाथहून उल्हासनगरकडे लोकलने प्रवास करत असताना ट्रेनमधून पडला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. या दुर्देवी अपघातानंतर परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. एक तरूण नोकरीला जात असताना त्याचा धावच्या लोकलमधून पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर धावत्या लोकलमधून पडून आणखी एका तरूणाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित मगर असे मृत तरूणाचे नाव आहे. तो २५ वर्षांचा होता. हा तरूण उल्हासनगरमधील सम्राट अशोक नगर परिसरातील रहिवासी होता.

Thane Crime : भयानक कृत्य! खेळणे देण्याच्या बहाण्याने घरी नेत मुलीवर अत्याचार; आरडाओरड केल्याने सहाव्या मजल्यावरून फेकल

मृत तरूण अंबरनाथहून उल्हासनगरकडे जात असल्याची माहिती समोर आली आहे. लोकलने प्रवास करत असाताना कानसाई ते उल्हासनगर दरम्यान तो लोकलमधून खाली पडला. धावत्या ट्रेनमधून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेत उल्हासनगरच्या मध्यवर्ती रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. हा अपघात कसा घडला, याचा शोध पोलीस घेत आहेत. या दुर्देवी घटनेनंतर परिसरातून खळबळ उडाली आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply