Libya Flood: लिबियात विनाशकारी पूर; ५ हजार ३०० जणांचा मृत्यू, सुमारे 10 हजार लोक बेपत्ता

Libya Flood : लिबियाच्या समुद्रात आलेल्या डेनियनल वादळामुळे डेरना शहरात आलेल्या पुरानं मोठं नुकसान झालंय. या पुरात ५ हजार ३०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय. तर १० हजार पेक्षा अधिक जण बेपत्ता झाले आहेत. याविषयीची माहिती गृहमंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद अबू- लामोशा यांनी दिलीय. रविवारीच्या दिवशी वादळामुळं समुद्राचं पुराचं पाणी संरक्षण बांध तोडत शहरात घुसलं आणि संपूर्ण शहर पाण्यात वाहून गेलं. मिळालेल्या माहितीनुसार, डेरनामध्ये आतापर्यंत १५०० मृतदेह मिळाली आहेत. तर मृतांचा आकडा अजून वाढण्याचा अंदाज आहे. 

Pune Isis Module Case: पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात NIAचा मोठा निर्णय; चार वॉंटेड आरोपींवर ठेवले लाखोंचे बक्षिस

आंतरराष्ट्रीय संस्था रेड क्रास आणि रेड क्रिंसेट सोसायटीनुसार, पुरामुळं १० हजार जणं बेपत्ता झाले आहेत. आपत्ती निवारण मंत्रालयाचे मंत्री हिचेम चिकीओत यांनी दिलेल्या माहितीनुसार, डेरनाच्या विनाशकारी पूर मी पाहिलं. चहुबाजुला मृतदेह पडले आहेत. रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठी जागा कमी पडत आहे. हानी होण्याची संख्या निश्चितच जास्त असणार आहे. चिकीओतनुसार, मृतांची संख्या वाढू शकते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply