Lavasa Sold : देशातील पहिले खाजगी हिल स्टेशन 'लवासा'ची विक्री! तब्बल १८१४ कोटींची डील; खरेदीदारांना 5 वर्षांत मिळणार घरे

Lavasa Hill Station News : नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने भारतातील पहिले खाजगी हिल स्टेशन लवासा डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चरच्या विक्रीस मान्यता दिली आहे. डार्विनने सादर केलेल्या रिझोल्यूशन प्लॅनला कंपनीच्या कर्जदात्यांनी मंजूरी दिल्यानंतर एनसीएलटीने खरेदी प्रक्रियेचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे पुण्याच्या जवळ असलेल्या लवासावर डार्विन प्लॅटफाॅर्म इन्फ्रास्ट्रक्चरचा मालकी हक्क असणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याच्या मुळशी तालुक्यातील बहुचर्चित लवासा प्रकल्प हा देशातील पहिला खासगी हिल स्टेशन प्रकल्प होता. मुंबईतील  डार्विन ग्रुपने लवासा खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तब्बल 1,814 कोटी रुपयांमध्ये ही खरेदी होणार आहे.

हा प्रकल्प दिवाळखोरीत असल्यामुळे त्यास एनसीएलटीची मंजुरी हवी होती. अखेरी त्याला मान्यता दिल्याचे आदेश एनसीएलटीचा मुंबई खंडपीठाने काढले आहेत. लवादाने शुक्रवारी दिलेल्या २५ पानांच्या आदेशात १८१४ रुपयांच्या गुंतवणुकीच्या योजनेला मंजुरी दिली.

Gujarat Floods : गुजरातमध्ये मुसळधार पावसाचे थैमान! जुनागडसह इतर भागात पूर; अनेक वाहने गेली वाहून

मुळशी तालुक्यातील १८ गावांमध्ये हा प्रकल्प उभारण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी १२ हजार ५०० एकर जमिनी घेतली आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होण्यासाठी अजून ८ ते १० वर्षे लागू शकतात. या प्रकल्पात घर खरेदी करण्यासाठी ज्यांची रक्कम अडकली होती, त्यांनी आता भरपाई मिळणार आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply