Latur ZP Election Result 2026 : लातूरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीत काँग्रेसचा विजय

लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026 मध्ये काँग्रेसने आपला पारंपरिक बालेकिल्ला पुन्हा काबीज करत एक मोठा विजय नोंदवला आहे. लातूरमध्ये काँग्रेसची विजयी आघाडी दिसून येत आहे, विशेषतः आरवी गटामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.

2017 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने लातूरमध्ये मुसंडी मारत बहुमत मिळवले होते. त्यावेळी भाजपला 36 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेस 15 जागांवर होती. मात्र, आता चित्र बदलले असून, काँग्रेसने 2017 मध्ये भाजपने मिळवलेला विजय स्वतःकडे खेचून घेतला आहे. महापालिका निवडणुकांपासून लातूरमध्ये काँग्रेस पुन्हा एकदा आपली ताकद आजमावत आहे आणि आता जिल्हा परिषदेमध्येही आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *