Latur Politics : लातूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; माजी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सूनेचा भाजपमध्ये प्रवेश

 
 
Latur Politics : लातूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेली डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा खरी ठरली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी आज शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
 
काही महिन्यांपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांच्यानंतर आणखी काही काँग्रेस नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. त्यात माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांचं नाव आघाडीवर होतं.
 
काल डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर आज शनिवारी डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला.
 
दरम्यान, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवाजी पाटील चाकूरकर यांचे पूत्र माजी आमदार बसवराज पाटील यांनी आधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी अशोक चव्हाण यांच्याआधीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. महाराष्ट्रात लोकसभेदरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडताना दिसत आहे. याआधी देखील काँग्रेसमधून अनेक नेत्यांनी इतर पक्षात प्रवेश केला आहे.
 
तत्पूर्वी , काही महिन्यांपूर्वी अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांनी पक्षाची साथ सोडली आहे. या बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply