
Latur Gram Panchayat Election 2022 : राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीत आपलाच उमेदवार निवडून यावा यासाठी गावकऱ्यांची धावपळ सुरू आहे. अशातच, ग्रामपंचायत निवडणुकीत पत्नीच्या सरपंचपदाचा प्रचार करत असताना पतीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना लातूर जिल्ह्यातील मुरुड परिसरात घडली आहे.
अमर पुंडलिक नाडे (वय 45 वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, अमर यांच्या पत्नी अमृता नाडे या मुरूड ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवार आहेत. गुरूवारी अमृता यांच्या प्रचारार्थ मुरुड शहरातील सार्वजनिक चौकात त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
दरम्यान, प्रचाराची जाहीर सभा सुरू असताना अमर नाडे यांनी भाषण सुरू केलं. मात्र, भाषण करत असताना अचानक ते स्टेजवर कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अमर यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. अमर यांच्या अचानक निधनाने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
लातूर जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. जिल्ह्यातील 351 पैकी 337 ग्रामपंचायत निवडणूकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. यातील 14 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या आहेत. आतापर्यंत 16 सरपंच व 399 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. सर्व स्तरावर ग्रामपचायत सदस्यांना मतदानासाठी आकर्षित करण्यासाठी उमेदवार प्रचार करत आहेत.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

