latur crime : धक्कादायक! १५ जणांच्या टोळीकडून हातपाय बांधून बेदम मारहाण; तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

latur crime : लातूरच्या अहमदपूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूरच्या अहमदपूरमध्ये १० ते १५ जणांच्या टोळीने केलेल्या मारहाणीनंतर तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील हाडोळती परिसरात दहा ते पंधरा जणाच्या टोळीने एका तरुणाला अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी १० ते १५ जणांच्या टोळीने हातपाय बांधून तरुणाला मारहाण केली. टोळीने मारहाण केल्यानंतर काही नागरिकांनी तरुणाला रुग्णालात दाखल केलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर मागील दिवसांपासून तरुणावर उपचार सुरु होते. मात्र, आज शनिवारी उपचार घेताना तरुणाचा मृत्यू झाला.

तरुणाच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी ११ जणांविरोधात लातूरच्या अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या तरुणाच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हाडोळती गावात एक तरुण हातात बिअरची काचेची बाटली फोडून रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीवर हल्ला चढवत जखमी करत होता. हाडोळती गावात बुधवारी सकाळी आठ वाजता हा प्रकार घडत होता. त्यामुळे या तरुणाला गावातील जमावाने हातापायांना बांधून मारहाण केली होती

मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी अहमदपूर येथे पाठवण्यात आले होते. मात्र गंभीर दुखापत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी लातूर येथे हलवण्यात आले होते. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव दिलीप उर्फ विलास नागोराव वाळिंग्रे असं आहे.

या प्रकरणी आता मृत तरुणाच्या आईच्या तक्रारीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात ११ जनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply