Latur Breaking News : शालेय कार्यक्रमातील आसनव्यवस्था कोसळली, ४० हून अधिक विद्यार्थी जखमी

Latur Breaking News : लातूर जिल्ह्यातील आलमला येथील शालेय कार्यक्रमातील आसन व्यवस्था कोसळून 40 हून अधिक विद्यार्थी जखमी असल्याची माहिती आहे. कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थित कार्यक्रम होणार होता. दरम्यान जखमी विद्यार्थ्यांना औसा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही विद्यार्थ्यांना लातूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

लातूर जिल्ह्यातील आलमला येथील विश्वेश्वरय्या शिक्षण प्रसारक मंडळच्या प्रांगणात औसा तालुका स्तरावरील आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते होणार होतं. मात्र कॅबिनेट मंत्री येताच कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेले लाकडी आसन कोसळले.

Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादी कोणाची?, पवार विरूद्ध पवार, अपात्रतेबाबतची सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून

या कार्यक्रमाला विद्यार्थ्याची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने विद्यार्थ्यांना बसण्यासाठी लाकडी आसनव्यवस्थेची व्यवस्था करण्यात आली होती. कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थित कार्यक्रम होणार होता. त्याचवेळी विद्यार्थीच्या संख्या वाढली आणि लाकडी आसनव्यवस्था कोसळून पडली आहे. दरम्यान जखमी विद्यार्थ्यांना औसा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही जखमींना लातूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.यात एकूण 40 विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply