Latur Crime : लॉजवर सुरु होता देहविक्रीचा व्यवसाय; छापा टाकत पोलिसांची कारवाई, सात जण ताब्यात

Latur : लातूर शहरातील शिवाजी रोडवरील स्क्रॅप मार्केट परिसरात असलेल्या एका लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु होता. याठिकाणी पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली असून या कारवाईत पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले असून तीन फरार झाले आहेत. तसेच याठिकाणाहून दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. या कारवाईमुळे लातूर शहरात खळबळ उडाली आहे.

लातूर शहरातील नेहमी वर्दळ असलेल्या स्क्रॅप मार्केट परिसरात असलेल्या आनंद लॉजमध्ये वेश्या व्यवसाय चालविला जात होता. तर लॉजचे मालक व व्यवस्थापक तसेच त्यांचे साथीदार हे परराज्यातील महिलांना लॉजवर आणून एजंटमार्फत ग्राहक आणून देहविक्रीचा व्यवसाय चालवीत होते. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानंतर मानवी तस्करी विरोधी विभागाच्या पोलिसांनी लॉजवर छापा टाकला.

Vaishnavi Hagawane : 'हे प्रकरण साधं नाही, जखमा पाहून हत्याच..' हगवणे प्रकरणात ट्वीस्ट, राष्ट्रवादीच्या बड्या

नेत्याला वेगळाच संशय

बनावट ग्राहक पाठवून टाकला छापा

छापा टाकताना पोलिसांनी सदर लॉजवर बनावट ग्राहक पाठविला. पोलिसांनी पाठविलेल्या बनावट ग्राहकाने पोलिसांना इशारा करताच पथकाने लॉजवर छापा टाकला. सदर छाप्यात परराज्यातील दोन महिला मिळून आल्या. या दोन्ही महिलांची सुटका करण्यात आली. तर लॉज व्यवस्थापक व इतर सात जणांना ताब्यात घेण्यात आले. तसेच याप्रकरणी दहा जणावर गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

लातूरमध्ये खळबळ

दरम्यान लातूर शहरातील नेहमी वर्दळ असलेल्या परिसरातील लॉजवर पोलिसांनी छापेमारी करत कारवाई केली आहे. सात जणांना ताब्यात घेण्यात आले असून तिघेजण फरार आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या मागे आणखी काही मोठे रॅकेट आहे का? याचा तपास पोलीसांकडून सुरु करण्यात आला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply