Murud Rural Hospital : मुरुड ग्रामीण रुग्णालयाच्या जीर्ण इमारतीचा भाग कोसळला; मोठा अनर्थ टळला

 

Latur : ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्य सेवेसाठी ग्रामीण रुग्णालयाची सुविधा उपलब्ध असता. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील मुरुड येथे ग्रामीण रुग्णालय असून या रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली आहे. यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांचा जीव धोक्यात आहे. दरम्यान जीर्ण इमारतीचा काही भाग आज ढासाळला असून रुग्णालयातील मोठा अनार्थ टळला आहे.

लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयातील मोठा अनार्थ टळला आहे. साधारण ६० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालय इमारतीच्या छताचा काही भाग ढासळला आहे. दरम्यान जीर्ण झालेल्या इमारतीमुळे नवीन उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी मिळाली आहे. मात्र मागच्या अनेक दिवसापासून इमारतीचं काम बंद आहे. यामुळे सध्या तरी रुग्णांना ग्रामीण रुग्णालयाचाच आधार आहे.

Maharashtra Politics : महायुतीमध्ये पुन्हा वादाची ठिणगी, मंत्री भरत गोगावाले यांची अजित पवारांच्या माजी आमदारावर सडकून टीका

रुग्ण, डॉक्टरांचा जीव धोक्यात

६० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयाची इमारत आता जीर्ण अवस्थेत उभी असल्याने रुग्णालयातील रुग्णांचा आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचा जीव धोक्यात आहे. इमारतीच्या छताचा काही भाग आज ढासळला असून यात रुग्णालयात आलेले रुग्ण थोडक्यात बचावले आहेत. अर्थात यात मोठा अनर्थ टळला आहे. यामुळे आता नवीन इमारतीची मागणी जोर धरू लागली आहे.

निधी मंजूर असूनही काम सुरु होईना

दरम्यान माजी आमदार धीरज देशमुख यांनी या नवीन इमारतीसाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नवीन इमारतीसाठी निधी मंजूर असूनही काम सुरू का होत नाही? असा सवाल नागरिक विचारत आहे. मुळात ग्रामीण रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली असताना नवीन इमारत उभारणीकडे दुर्लक्ष केले जात असून येथे मोठी दुर्घटना घडल्यास कोण जबाबदार असा देखील उपस्थित केला जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply