Mumbai Goa Highway : बेजबाबदार कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

Latest Kokan News: गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या नागरिकांना दरवर्षी खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महामार्गाची पाहणी करत झाडाझडती घेतली. 'ज्या कंत्राटदारांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम घेऊन कंत्राट सोडून पळ काढला आहे,

अशा कंत्राटदारांच्या दिरंगाईने या मार्गावर अपघात घडत आहेत. अशा बेजबाबदार कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांना देण्यात आलेले आहेत. यात कोणालाही दयामाया दाखवली जाणार नाही,' अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदारांना इशारा दिला.
मुख्यमंत्री शिंदे यांनी पळस्पे ते कशेडी घाट या दरम्यान अधिकाऱ्यांसह ठिकठिकाणी थांबून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. गणेशोत्सवास काही दिवस शिल्लक असताना या महामार्गावरील खड्डे भरण्याच्या कामाने अद्याप वेग घेतलेला नाही. हे रडगाणे मागील अनेक वर्षांपासून चालू आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची खड्डयांमुळे गैरसोय होऊ नये म्हणून शिंदे यांनी आज पाहणी दौरा आयोजित केला होता.

Emergency Helpline For Govinda's: दहीहंडीतील जखमी गोविंदांसाठी हेल्पलाइन जारी, 'या क्रमांकांवर साधा संपर्क

या रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे आणि ते बुजवतान्त येणाऱ्या अडचणी त्यानी समजून घेतल्या. गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कामाची पाहणीही त्यांनी यावेळी केली. यानंतर याबाबत अधिकाऱ्यांबरोबर सविस्तर चर्चाही केली.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना त्रास होऊ नये, यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. "कोकणात पडणारा पाऊस आणि डांबराने भरण्यात येणारे खड्डे हे समीकरण जुळत नसल्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रभावीपणे केला जात आहे.

ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत, त्या ठिकाणी सिमेंटच्या तयार प्लेट्स वापरून काही तासांत रस्ता वाहतुकीसाठी योग्य केला जात आहे," असे शिंदे म्हणाले. एम- ६० आरएफसी-लिओ पॉलिमर पद्धत, रॅपिडेक्स हार्डनर एम-६० पद्धत, डीएलसी या तीन पद्धतींबरोबरच ब्रिक्स कास्ट एम-६० या पद्धतीने सिमेंटच्या तयार प्लेट्स बसवून रस्ता तयार करण्यात येत आहे, असे अधिकाऱ्याऱ्यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply