
Latur : लातूरजवळील जवाहर नवोदय विद्यालयातील सहावीत शिकणाऱ्या अवघ्या ११ वर्षांच्या अनुष्का किरण पाटोळे हिच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. "माझ्या लेकीने आत्महत्या केली नाही, तर तिचा घातपात झाला आहे," असा आक्रोश करत आज लातूरच्या ऐतिहासिक गांधी चौकात महिलांनी रौद्र रूप धारण केले. संतप्त महिलांनी चक्क आपल्या साड्यांची दोरी तयार करून रस्ता रोखून धरल्याने शहराची वाहतूक तासनतास ठप्प झाली होती.
जवाहर नवोदय विद्यालयाच्या वसतिगृहात काल अनुष्काचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. शाळेत अत्यंत हुशार आणि चुणचुणीत समजल्या जाणाऱ्या अनुष्काने टोकाचे पाऊल उचलल्याचे वृत्त समजताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. प्राथमिक अंदाजानुसार अभ्यासाचा ताण असल्याचे बोलले जात असले तरी, अनुष्काच्या नातेवाईकांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. शाळेत काहीतरी काळंबेरं असून अनुष्काचा घातपात झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
|
|
गांधी चौकात महिलांचा आक्रोश
आज सकाळी अनुष्काच्या न्यायासाठी शेकडो महिला आणि नातेवाईक गांधी चौकात एकवटले. आंदोलनाचे स्वरूप इतके तीव्र होते की, महिलांनी रस्त्यावर आडवे पडून आणि हातात साड्या धरून मानवी साखळी तयार केली. "दोषींना आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्यांना शासन करू," अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. भर उन्हात महिलांचा सुरू असलेला आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यांतही पाणी आले.
पोलिसांचा बळाचा वापर, तणाव कायम
रास्ता रोकोमुळे लातूर शहरातील मुख्य बाजारपेठेतील वाहतूक पूर्णपणे कोलमडली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने पोलिसांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला हटायला तयार नसल्याने अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून रस्ता रिकामा केला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांना ओढून रस्त्याबाहेर काढले, पण महिलांचा संताप शांत झालेला नाही.
सध्या एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, विद्यालयातील सुरक्षिततेवर आणि अनुष्काच्या मृत्यूच्या कारणांवरून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. जोपर्यंत सत्य समोर येत नाही, तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel


1 thought on “Larur : लातूर विद्यार्थिनी मृत्यू प्रकरण तापलं! नवोदयच्या अनुष्काचा मृत्यू की घातपात? गांधी चौकात महिलांचा संताप, साड्यांच्या दोरीने रस्ता रोखला”