Lalit Patil Case : ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट: पोलिसांकडून ससूनच्या कर्मचाऱ्यासह कॉन्स्टेबलला अटक

Lalit Patil Case : राज्यात सध्या ललित पाटील प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. ललित पाटीलने पलायन केल्यानंतर पुण्यातील ससून रुग्णालय चौकशीच्या फेरीत अडकल्याचे दिसतेय. काल रात्री उशिरा ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवतेला पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता या प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर आली असून एका पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार ललित पाटील  प्रकरणी ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवतेला पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणील आणखी एक मोठी कारवाई केली असून कारागृहातील पोलिस कर्मचारी मोईज शेख याला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.

Beed News : बीडमधील जाळपोळ, दगडफेक प्रकरण; प्रमुख आरोपीसह २६२ जण ताब्यात

अटक करण्यात आलेल्या दोघांना एक डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, ससूनमधून ललित पाटीलने पलायन केल्यानंतर हे प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे तसेच कॉंग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी या प्रकरणी शिंदे- फडणवीस सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप केले होते.तसेच या प्रकरणात ससूनच्या डीनवरही कारवाईची मागणी करण्यात आली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply