Lalit Patil : 'ललित पाटीलची मैत्रीण प्रज्ञा कांबळे मनोरुग्ण', जामिनासाठी वकिलांची कोर्टात धाव

Lalit Patil : ड्रग्ज माफिया ललित पाटील याची मैत्रीण प्रज्ञा कांबळे मनोरुग्ण असल्याच्या दावा तिच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे. प्रज्ञावर मानसिक उपचार सुरु असून तिला जामीन द्यावा, यासाठी कोर्टाकडे अर्ज करण्यात आलेला आहे.

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणातील आरोपी प्रज्ञा कांबळे हिच्यावर मानसिक आजाराचे उपचार सुरू आहे, असा दावा तिच्या वकिलांनी केला आहे. त्यासंबंधीचे वैद्यकीय प्रमाणपत्र वकिलांनी न्यायालयात सादर केले. सध्या प्रज्ञा पोलिस कोठडीत असून तिच्या जामिनासाठी वकिलांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

Follow us -

Sanjay Raut : अनाडी घोडे उधळलेले आहेत, ग्रामपंचायत निकालानंतर राऊतांचा हल्लाबोल; भुजबळ, अजितदादा महादेव अॅपचे मेंबर असल्याची टीका

प्रज्ञा कांबळेवर २०१९ पासून उपचार सुरू असल्याचे अर्जामध्ये नमूद केले आहे. शिवाय अर्जाची पुष्टी करणारे वैद्यकीय प्रमाणपत्र अर्जासोबत जोडण्यात आले आहे. ससून रुग्णालयातून पळून जाण्यापूर्वी ललित त्याच्या मैत्रिणी अर्चना, प्रज्ञा यांना भेटला होता, दोन दिवसांच्या भेटीदरम्यान त्यांनी त्याला २५ लाख रुपये दिल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply