Lalit Pati Drug Case : ड्रगमाफिया ललितसह 12 जणांवर मोक्का, विशेष कोर्टात चालणार खटला; नाशिकमधून आणखी 5 किलो सोने जप्त

Lalit Pati Drug Case : ड्रग्ज माफिया ललित पाटील आणि त्याच्या 12 साथीदारांवर मोक्का कायद्यांतर्गत पुणे पोलिसांनी   गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.  अरविंदकुमार लोहरे  आणि ललित पाटील हे टोळी प्रमुख होते. लोहरे हा एमडी बनवणारा महाराष्ट्रातील एक्स्पर्ट होता. ड्रगमाफिया ललित पाटीलकडून आणखी पाच किलो सोने जप्त करण्यात आले आहे. ड्रग्ज विकून मिळालेल्या पैशातून ललितनं सोनं विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे. 

ललित पाटीलकडून आणखी पाच किलो सोने जप्त करण्यात आले होते. यापूर्वी तीन किलो सोने जप्त करण्यात आले. आतापर्यंत आठ किलो सोने जप्त करण्यात आले. अंमली पदार्थ विकून मिळालेल्या पैशातून ललित पाटीलने हे सोने विकत घेतले होते. गुरुवारी पुणे पोलिसांची एक टीम ललित पाटील ला घेऊन  नाशिक ला गेली होती. त्यानंतर त्यांनी हे सोने जप्त केले. ललित पाटीलने एका व्यक्तीकडे हे सोने ठेवण्यासाठी दिले होते. याशिवाय आम्ही पदार्थ तयार करणाऱ्या ललित पाटील आणि टोळीवर पुणे पोलिसांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण  (मोक्का) कायद्यानुसार कारवाई केली आहे.

Maratha Reservation : जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतल्यानंतर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये, मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली जिल्हाधिकाऱ्यांची बैठक

ललित पाटीलने कोणतेही अंमली पदार्थ तयार केले नाही, वकिलांचा दावा

ड्रग्ज माफिया ललित पाटिलला तपासासाठी पुणे पोलिसांनी मुंबई पोलीसांकडून ताब्यात घेतले आहे. ललित पाटीलला सात नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी  सुनावण्यात आली आहे. ललित पाटीलच्या जीवाला पुणे पोलिसांकडून धोका आहे.  ललित पाटील ससुन रुग्णालयात असताना त्याला पोलिसांकडून बेदम मारहाण झाल्याचा दावा ललितच्या वकिलांनी गुरूवारी कोर्टात केला. ललित पाटील आजारी असून त्याच्यावर हर्णीयाची शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याच सांगत ललित पाटीलच्या वकिलांकडून पोलीस कोठडीला  विरोध केला होता. तसेच ललित पाटीलने कोणतेही अंमली पदार्थ तयार केले नसल्याचा त्याच्या वकिलांचा न्यायालयात दावा केला होता. 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply