Lalbaugh Crime : जन्मदात्या आईला मारून केले तुकडे; २४ वर्षीय मुलीचं राक्षसी कृत्य, २ महिन्यांनी असा झाला हत्येचा उलगडा

Lalbaugh Crime News : मुंबईच्या लालबाग परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्याच ५५ वर्षीय आईची हत्या करून मृतदेहाचे इलेक्ट्रिक मार्बल कटर आणि कोयत्याच्या मदतीने तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हत्येच्या तब्बल दोन ते तीन महिन्यांनंतर पोलिसांनी घरातूनच महिलेच्या शरीराचे तुकडे जप्त केले आहेत. 

याप्रकरणी काळाचौकी  पोलिसांनी रिंपल जैन नावाच्या चोवीस वर्षीय महिलेला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत वीणा जैन यांच्या शेजाऱ्यांनी त्यांचा भाऊ सुरेशकुमार पोरवाल यांना त्यांची बहीण गेल्या कित्येक दिवसांपासून बेपत्ता असल्याचं सांगितलं.

मंगळवारी पोरवाल यांची मुलगी वीणा जैन यांना महिन्याच्या खर्चाचे पैसे देण्यासाठी इब्राहीम कासम चाळ येथील घरी आली. मात्र रिंपलने तिला घरी घेतले नाही त्यानंतर सुरेशकुमार पोरवाल आले असता त्यांना देखील घरी न घेतल्याने त्याला संशय आला.

अखेर दरवाजा तोडून त्यांनी घरात प्रवेश केला असता वीणा सापडली नाही पण घरातून दुर्गंधी येत होती त्यातून त्यांचा संशय आणखीन बळावला. त्यांनी थेट काळाचौकी पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता सुरुवातीला हरवल्याची तक्रार नोंदवली आणि घरी जाऊन पाहणी केली असता घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्लास्टिकच्या गोणीत गुंडाळलेले मृतदेहाचे तुकडे आढळले.

वीणा यांच्या शरीरापासून त्यांचे हात पाय वेगळे करण्यात आले होते. धड हे प्लास्टिकच्या गोणित गुंडाळून कपाटात ठेवण्यात आले होते. तर हात पाय हे स्टीलच्या टाकीतून जप्त करण्यात आले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार किरकोळ वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

हत्येनंतर मुलीने इलेक्ट्रिक मार्बल कटर, कोयता आणि सुरीच्या सहाय्याने मृतदेहाचे तुकडे केल्याचे समोर आले आहे. पोलिसांना घरातून शरीराच्या तुकड्यांसह इलेक्ट्रिक मार्बल कटर, कोयता आणि सुरी देखील जप्त केली आहे. आई आणि तिच्या मुलीमध्ये नेमक्या कोणत्या कारणावरून वाद होता याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच या हत्येत अजून कोणी सहभागी आहे का याचा तपास सध्या काळाचौकी पोलीस करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply