Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा बळीराजाला फटका? लाडक्या बहिणीमुळे सिंचन योजनेचं अनुदान थकलं

 

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे आता राज्यातील बळीराजाला मोठा फटका बसलाय. लाडकीमुळे सिंचनाचं अनुदान थकल्याचं समोर आलंय.मात्र किती अनुदान थकलं आहे? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळवून देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेनं राज्याचं एकूणच आर्थिक गणित बिघडवून टाकल्याचं चित्र आहे. दर महिन्याला दिल्या जाणाऱ्या सन्मान निधीमुळे सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार पडतोय यामुळे अनेक योजनांवर परिणाम झालाय आणि त्यातून बळीराजाही सुटला नाहीये.

मराठवाड्यात शेतकऱ्यांना मिळणारं 152 कोटी 71 लाखांचं अनुदान थकलंय. एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं 5 कोटी 60 लाखांचं अनुदान थकलंय.अनेक शेतकरी पदरचे पैसे खर्च करुन ठिबक सुरू करतात. मात्र त्या शेतकऱ्यांच्या खात्यातही अनुदान जमा झालेलं नाही. मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात किती अनुदान थकलंय त्यावर एक नजर टाकुया.

ठिबक सिंचनचं अनुदान थकलं

छत्रपती संभाजीनगर 84 कोटी 99 लाख थकीत

जालना 47 कोटी 50 लाख थकीत

बीड 20 कोटी 22 लाख थकीत

एकूण थकीत अनुदान 152 कोटी 71 लाख

निधीच नसल्यानं शेतकऱ्यांना पैसे द्यायचे तरी कुठून?. असा प्रश्न कृषी विभागाला पडलाय. केवळ ठिबक सिंचनचं अनुदानच नव्हे तर लाडक्या बहिणींमुळे राज्यातील कोण कोणत्या योजनेला फटका बसलाय त्यावर एक नजर टाकू.

लोकप्रिय योजना, पैसा पुरेना?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

46,000 कोटी ₹

मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना

14,761 कोटी ₹

मुलींना मोफत उच्च शिक्षण

1,800 कोटी ₹

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण

5,500 कोटी ₹

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

1,300 कोटी ₹

लेक लाडकी योजना

1,000 कोटी ₹

मुख्यमंत्री वयोश्री योजना

480 कोटी ₹

गाव तिथे गोदाम योजना

341 कोटी ₹

शेतकऱ्यांसाठी राज्यसरकार खरं तर अनेक योजना राबवत असतं मात्र लाडक्या बहिणींच्या मतांच्या महासागरात डुबकी मारल्यामुळे सध्या राज्यकर्त्यांना बळीराजाचा विसर पडल्याचं चित्र दिसत आहे.

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply