Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीनेच अनेक महिलांना फसवलं, योजनेच्या नावाखाली गरीबांकडून उकळले पैसे; पोलिसांत गुन्हा

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. गेल्या काही दिवसांपासून या योजनेमुळे चांगलीच चर्चा होत आहे. अनेक ठिकाणी या योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये एका महिलेने लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनेक महिलांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या मंजुरीसाठी दलाली करणाऱ्या एका महिलेविरोधात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या नावे पैसे घेणाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्यानुसार लाडकी बहिण योजनेसाठी बहिणींची आर्थिक लूट केल्याप्रकरणी या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलांची आर्थिक लूक करणारा हा राज्यातील पहिला गुन्हा आहे.

Baramati Accident : भरधाव कारचा टायर फुटला, अपघातामध्ये काँग्रेस नेत्याच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

लाडकी बहीण योजनेसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मंजूर करून देण्यासाठी निराधार, गरीब महिलांकडून पैसे उकळणाऱ्या संभाजीनगर जिल्ह्यातील वंदना म्हस्के या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. वंदना मस्के ही महिला प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाध्यक्ष असल्याचे लेटर हेड वापरते. त्या पदावरून तिने यापूर्वी उपोषणाचा इशारा दिला होता. शिवाय याच लेटरहेडचा वापर करून ती शासनाच्या विविध कार्यालयातून माहिती मागवत असते.

वंदना म्हस्के ही गरीब महिलांना लुटत असल्याचे गाऱ्हाणे काही महिलांनी तहसीलदारांसमोर मांडले. त्यानंतर तहसीलदारांनी महिलांचे जबाब घेत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वंदना म्हस्के या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अनुदान मंजूर करण्यासाठी, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळून देण्यासाठी वंदना मस्के ही गोरगरीब महिलाकडून पैसे उकळत होती. पैसे देऊन देखील अनुदान खात्यावर जमा होईना म्हणून महिलांनी वंदना म्हस्के यांना विचारले असता त्या धमक्या देत असल्याने महिलांनी तहसीलदारांची भेट घेत तक्रार दाखल केली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply