Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रासाठी अडवणूक, पैशांची मागणी; ग्रामसेवक निलंबित

Ladki Bahin Yojana : राज्य शासनाने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांची कागतपत्रांची जुळवाजुळव सुरु आहे. मात्र अर्ज भरताना कागतपत्रांसाठी अडवणूक करून त्यासाठी ग्रामसेवकांकडून पैशांची मागणी केली जात होती. याबाबत तक्रार केल्यानंतर सदर ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश काढले आहेत. 
 
राज्य शासनाने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. यासाठी १ जुलैपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी  ग्रामसेवक, अंगणवाडी सेविकांना सदरचे काम देण्यात आले आहे. दरम्यान या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागतपत्रांची आवश्यकता आहे. यासाठी महिलांची लगबग सुरु आहे. मात्र काही ठिकाणी कागतपत्रांसाठी अडवणूक केली जात आहे. तर पैशांची मागणी देखील केली जात आहे. राज्यात असे दोन प्रकरण समोर आले असून यात दोन तलाठीना निलंबित करण्यात आले आहे. तर हिंगोलीत आता एका ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
 
हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मुकुंद घनसावंत हे लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी ग्रामस्थांची अडवणूक करत आर्थिक रकमेची मागणी करत होते. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या नंतर जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेत यांचं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबनाही कार्यवाही केली आहे. दरम्यान जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील राहून नागरिकांना योग्य मार्गदर्शन करण्याचे आव्हान देखील केले आहे.
 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply