Kunal Kamra : 'मी माफी मागणार नाही, अजित पवार जे बोलले तेच मी बोललो'; कुणाल कामराने स्पष्टच सांगितलं

Kunal Kamra : स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. कुणाल कामराविरोधात शिंदेसेना आक्रमक झाली असून त्यांनी एकनाथ शिंदे यांची माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. पण कुणाल कामराने महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची माफी मागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ऐवढंच नाही तर ज्याठिकाणी कुणाल कामराचा कॉमेडी शो झाला होता त्याठिकाणी झालेल्या तोडफोडीवरून त्याने टीका देखील केली आहे

कुणाल कामराने सोमवारी रात्री उशिरा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत माफी मागणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्याने या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'मी माफी मागणार नाही. अजित पवार यांनी एकनाथ शिंदेबद्दल जे बोलले होते तेच मी म्हटले आहे. मला या गर्दीची अजिबात भीती वाटत नाही आणि मी पलंगावर बसून हे प्रकरण थंड होण्याची वाट पाहणार नाही.'

त्याने या पोस्टमध्ये पुढे असे लिहिले की, 'मनोरंजन स्थळ हे फक्त एक व्यासपीठ आहे. ते कोणत्याही शोसाठी एक व्यासपीठ आहे. हॅबिटॅट माझ्या विनोदासाठी जबाबदार नाही आणि मी काय बोलतो किंवा करतो यावर त्याचा कोणताही अधिकार किंवा नियंत्रण नाही. तसेच इतर कोणत्याही पक्षाचा काही अधिकार नाही. विनोदी कलाकाराच्या बोलण्याने त्या स्थळाचे नुकसान करणे म्हणजे जर तुम्हाला चिकन दिले जात नसेल तर टोमॅटोचा ट्रक उलटवण्याइतका मूर्खपणा आहे.'

PMPML Bus : पीएमपीएमएल चालकांवर कठोर कारवाई, बस चालवताना मोबाईल वापर आणि तंबाखू सेवन केल्यास होणार निलंबन

कुणाल कामराने पुढे असेही सांगितले की, 'माझ्या माहितीनुसार आपल्या नेत्यांच्या आणि राजकीय व्यवस्थेच्या तमाशाची थट्टा करणे कायद्याच्या विरुद्ध नाही. माझ्याविरुद्ध कोणत्याही कायदेशीर कारवाईसाठी मी पोलिस आणि न्यायालयाला सहकार्य करण्यास तयार असलो तरी, विनोदामुळे नाराज झालेल्यांना तोडफोड हा कायदेशीर प्रतिसाद वाटणाऱ्यांना हा कायदा योग्य आणि समान रीतीने लागू होईल का? आज कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय हॅबिटॅट येथे हातोड्याने तोडफोड करणाऱ्या नगरपालिका सदस्यांनाही हा कायदा लागू होईल का?', असे प्रश्न कुणाल कामराने उपस्थित केले आहेत.

कुणाल म्हणाला की, 'कदाचित माझे पुढचे ठिकाण एल्फिन्स्टन ब्रिज किंवा मुंबईतील इतर कोणतेही ठिकाण असेल जे पाडण्याची नितांत गरज आहे.' तसंच, कुणाल कामराने त्यांचा नंबर लीक करणाऱ्यांवरही निशाणा साधला. 'जे माझा नंबर लीक करण्यात किंवा मला सतत कॉल करण्यात व्यस्त आहेत त्यांच्या आतापर्यंत हे लक्षात आले असेल की माझ्या व्हॉइसमेलवर अज्ञात कॉल येत आहेत जिथे तुम्हाला आवडत नसलेले गाणे ऐकू येईल.'



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply