Kunabi Certificate : पैसे द्या आणि कुणबी दाखला घ्या? एजंट अन् तरुणाच्या संवादाची ऑडिओ क्लीप VIRAL

Kunabi Certificate : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. सर्व मराठा बांधवांना सरसकट कुणबी दाखले द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलीये. यावर ज्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहेत त्यांना शासनामार्फत कुणबी दाखले देण्याचे काम सुरू आहे. अशात कुणबी दाखले देत असताना लाच घेतली जात असल्याची एक धक्कादायक घटना समोर आलीये.  

व्हायरलऑडिओ क्लिपमध्ये कुणबी दाखला मिळवण्यासाठी एक तरुण आणि एजंट यांच्यातील ऑडिओ क्लिप समोर आलीये. यामध्ये कुणबी दाखल्यासाठी हजारोंची लाच घेतली जात असल्याचं समजतंय. पुण्यातील खेड येथील ही घटना असल्याची माहिती मिळालीये.

Manoj Jarange Patil : 'मिळेल त्या वाहनाने, सर्व साहित्य घेऊन मुंबईत या...' जरांगेंचे मराठा बांधवांना आवाहन; भुजबळांवर टीका

ऑडिओ क्लीपमधील संवाद?

एजंट - नमस्कार...

अर्जदार - तुम्ही जी रक्कम सांगितली आहे ती जरा जास्त वाटली त्यामुळं बोललो बाकी काही नाही.

एजंट - नाही त्यात थोडेफार कमी जास्त पण होऊ शकतात. पण सहा एक हजार तर होतीलच.

अर्जदार - यातले चार टेबलला जातात ना, तहसिलदार कचेरीत? प्रत्येक टेबलला जात असतात?

एजंट - हो प्रत्येक टेबलला द्यावे लागणार.

अर्जदार - शे-पाचशे दिले तर नाही होणार का?

एजंट - तो काय साधा दाखला आहे काय? नाही कुणबीए तो! साधा असता तर ठीक होतं.

अर्जदार - कुणबी म्हटल्यावर मग किती लागतील?

एजंट - कुणबी म्हटल्यावर दोन-तीन हजार रुपये घेतातच. पण नक्की अंदाज नाही सांगू शकतं. पण दहापर्यंत तरी घेतील असा अंदाज आहे.

अर्जदार - म्हणजे दहा हजार रुपये धरुनच चालावं लागेल.

एजंट - हो.

ऑडिओ क्लीप खरी असल्याची पुष्टी नाही!

दरम्यान, ही ऑडिओ क्लीप खरी असल्याची पुष्टी पुणे बातम्या करत नाही. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply