Koyna Dam Update : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी; धरणात किती आहे साठा? महाबळेश्वरला 99 मिलिमीटर पावसाची नोंद

पाटण (सातारा) : कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. रात्रीपासून पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा ६७.७९ टीएमसी झाला.

जलाशयात प्रतिसेकंद २९ हजार २५२ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे ४७ मिलिमीटर, नवजाला ९१ मिलिमीटर वमहाबळेश्वरला ९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Almatti Dam : 'आलमट्टी'तून सव्वा लाख क्युसेक विसर्ग; पुराचा धोका टाळण्यासाठी निर्णय, महाराष्ट्राला दिली जातेय वारंवार अपडेट

गुरुवारी रात्री साडेआठ वाजता पायथा वीजगृहातील दुसरे जनित्र चालवून दोन हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात करण्यास सुरुवात केली आहे. त्याअगोदर एका जनित्राद्वारे एक हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply