Koyna Dam Update : कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृह केंद्राचा दरवाजा आज उघडणार; नदीकाठच्या गावांना इशारा

पाटण : कोयना धरणात ६२.४१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्याने आज (ता. २७) दुपारी चार वाजता कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातील दुसरे युनिट सुरू करण्यात येणार आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे सध्या एक युनिट कार्यान्वित असून, कोयना नदीमध्ये  एक हजार ५० क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.

दुसरे युनिट सुरू केल्यास कोयना नदीमध्ये सोडण्यात येणारा विसर्ग २१०० क्युसेक होईल, असे कोयना धरण व्यवस्थापनाने जाहीर केले आहे. गेल्या २४ तासांत कोयनानगर व महाबळेश्‍वरला १२४ मिलिमीटर आणि नवजाला १६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, जलाशयात प्रतिसेकंद ४२ हजार ६६९ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

Vishrantwadi Crime : गाड्यांची तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड

धरणाचा एकूण पाणीसाठा ६२.४१ टीएमसी झाला असून, कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर आज थोडा कमी झाला आहे. मात्र, संततधार कायम आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही कमी झाली असून, साडेतीन टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply