Koregaon Bhima Case : कोरेगाव भीमा हिंसाचारातील आरोपी गौतम नवलखा यांची सुटका, 24 तास नजरकैदेत

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांची तळोजा कारागृहातून सुटका झाली. पण तरीही नवलखा यांना नजरकैदेकत राहावं लागणार आहे. त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नवी मुंबईतील कम्युनिटी हॉलमध्ये नजरकैदेत ठेवावं, अशी मागणी त्यांनी केली होती.

मात्र त्यांना बेलापूरमधील अग्रोळी गावातल्या त्यांच्या घरी कडक सुरक्षा बंदोबस्तात नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी नवलखा यांच्यावर यूएपीए आरोप आहेत. हे प्रकरण 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत केलेल्या कथित प्रक्षोभक भाषणांशी संबंधित आहे.

या भाषणांमुळे दुसऱ्या दिवशी कोरेगाव-भीमा युद्ध स्मारकाजवळ हिंसाचार भडकल्याचा पोलिसांचा दावा आहे. पुणे पोलिसांनी दावा केला होता की, हे कॉन्क्लेव्ह माओवाद्यांशी संबंधित असलेल्या लोकांनी आयोजित केले होते. त्यानंतर एनआयएने तपास हाती घेतला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply